गुजरात एटीएसने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आहे. तीस्ता सेटलवाड या मुंबईतील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर स्थापन झालेल्या ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या एनजीओच्या त्या संस्थापक विश्वस्त आणि सचिव आहेत. २००२ मध्ये गुजरातमधील दंगलग्रस्तांचा विषय हाती घेणार्‍या पहिल्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी त्या एक होत्या. सेटलवाड यांच्यावर गेल्या काही वर्षांत अनेक आरोप केले गेले आहेत.

सेटलवाड यांनी पहिल्यांदा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. मार्च २००७ मध्ये, गुजरात उच्च न्यायालयासमोर विशेष फौजदारी अर्जात सेटलवाड यांनी स्वत:चे नाव सह याचिकाकर्त्या म्हणून लिहिले होते. या प्रकरणात झाकिया जाफरी या मूळ याचिकाकर्त्या होत्या. या याचिकेमध्ये त्यांनी मोदी आणि इतर ६१ राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. २००२ च्या गुजरात दंगलीतील कथित भूमिकेसाठी नरेंद्र मोदींविरोधात सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली. पुढे ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीला सर्व आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले. 

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…

२०१८ मध्ये, रईस यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या विरोधात अहमदाबाद डिसीबी पोलिस स्टेशनमध्ये आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांच्यावर २०१४ मध्ये साबरंग एनजीओसाठी दिलेल्या अनुदानाचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप करण्यात आला. सेटलवाड आणि आनंद यांनी ती तक्रार रद्द करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अजूनही ही याचिका गुजरात उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे.

अहमदाबाद क्राइम ब्रँचने २०१४ मध्ये सेटलवाड यांच्यासह तीन जणांवर एफआयआर दाखल केली होती. या एफआयआरमध्ये गुलबर्ग सोसायटीतील काही पीडितांनी सेटलवाड, आनंद आणि जाफरी यांचा मुलगा तनवीर यांच्यावर विश्वासघात, फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप केले होते. संस्थेला मिळालेल्या देणग्यांचा वापर सेटलवाड यांनी वैयक्तिक कारणासाठी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात आयडीबीआय आणि युनियन बँक या दोन बँकांमधील एनजीओची खाती या गोठवण्यात आली आहेत.

तीस्ता सेटलवाड या भारताचे पहिले ऑटर्नी जनरल एम सी सेटलवाड यांच्या नात आहेत. त्यांचे आजोबा चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या हंटर कमिशनमधील तीन भारतीय सदस्यांपैकी एक होते. एका वकिलाची मुलगी असणाऱ्या तीस्ता यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत पत्रकार म्हणून केली. १९९३ मध्ये त्यांनी भारतातील जातीय राजकारणाविषयी माहिती आणि विश्लेषण देण्यासाठी ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ हे मासिक मासिक सुरू केले. त्यासोबतच सबरंग कम्युनिकेशन्स नावाची संस्थासुद्धा स्थापन केली.