पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ११४७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या २४ हजार १६८ झाली आहे. तर आज दिवसभरात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ७७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत पुण्यात एकूण १४ हजार ९९८ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2020 रोजी प्रकाशित
धक्कादायक : पुण्यात एकाच दिवसात आढळले ११४७ नवीन रुग्ण
१९ रुग्णांचा मृत्यू
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 09-07-2020 at 01:19 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1147 new patients found in pune in a single day abn 97 svk