पुणे शहरात दिवसभरात २०६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६७ हजार ११८ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून चार हजार ४३५ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान १८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५७ हजार ८३६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६६ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १०९ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, उपचारादरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९० हजार ८५५ वर पोहचली असून पैकी, ८७ हजार ३८४ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७३६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.