26 January 2021

News Flash

पुण्यात करोनाचे २४१ नवे रुग्ण तर पिंपरीत १६४ नवे रुग्ण

पुण्यात करोनामुळे १२ तर पिंपरीत ६ जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २४१ रुग्ण आढळल्याने १ लाख ६२ हजार ८८८ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २९८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५३ हजार १३९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६४ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १३९ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८८ हजार ५८२ वर पोहचली असून पैकी ८५ हजार २१३ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८३२ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 9:55 pm

Web Title: 241 new corona cases in pune and 164 cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 कायदा मोडला तर कारवाई होणारच-कृष्ण प्रकाश
2 “साहेब माझ्या पत्नीचे डोळे पहिल्यासारखे सारखे करून द्या”
3 आता या घटनेवर का बोलत नाहीत; प्रविण दरेकर यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
Just Now!
X