पुणे शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पुण्याती करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. तर सहाशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच पुण्यातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गुरूवारी पुण्यात तब्बल ५० कंटेनमेंट झोन वाढले आहेत. पुण्यात आता एकू १०९ कंटेनमेंट झोन झाले आहेत. शहरात १७ जूनपर्यंत कंटेनमेंट झोनची संख्या ७४ इतकी होती. ती संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे.

सध्या करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्तीही वाढली आहे. जुन्या कंटेनमेंट झोनचा पालिकेमार्फत आढावा घेताना १५ क्षेत्रे वगळण्यात आली. तर नव्याने ५० ठिकाणांचा समावेश करण्यात आला. एकूण ७४ पैकी ९ क्षेत्रांची फेररचना करून सुधारणा करण्यात आली. सध्या प्रतिबंधित क्षेत्र ६.६९ चौरस किलोमीटर एवढे झाले आहे. वाढलेल्या कंटेनमेंट झोनमुळे पुण्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कंटेनमेंट झोनमध्ये जाण्या-येण्याचे मार्ग बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पालिकेमार्फत शहरातील कंटेनमेंट परिसर सील केला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिके कडून प्रतिबंधित क्षेत्राचा दर काही दिवसांनी आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राची सुधारित यादी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर के ली आहे. त्यामध्ये नव्या ठिकाणांची वाढ झाली आहे.

कोणते आहेत कंटेनमेंट झोन –
सदाशिव पेठेतील राजेंद्रनगर, मनपा कॉलनी, पर्वती दर्शन परिसरातील चाळ क्रमांक ६७, ७०, ९३, ९९, १०७, साईबाबा वसाहत परिसर, गणेश पेठेतील संत कबीर चौक ते डुल्या मारुती चौकापर्यंतचा लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता परिसर, घोरपडी येथील शक्तिनगर परिसर, ढवळे वस्ती, हडपसरमधील सव्‍‌र्हेक्षण क्रमांक २८२, मुंढवा परिसर, अरण्येश्वर येथील तावरे कॉलनी परिसर, शाहू कॉलेज रस्ता परिसर, कात्रज परिसरातील अय्यप्पा मंदिरालगतचा परिसर, शिवशंकर कॉलनी, बिबवेवाडी ओटा वसाहत, अपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज परिसर, येरवडा येथील अशोकनगर, भाटनगर, गणेशनगर, रामनगर, जय जवान नगर, यशवंतनगर, पर्णकु टी पायथा, शनी आळी, गवळीवाडा, हडपसरमधील अण्णा भाऊ साठे वस्ती, लक्ष्मीनगर, संगमवाडी, शिवाजीनगर, वाक डेवाडी, संभाजीनगर, महापालिका वसाहत, खराडीमधील थिटे वस्ती, थिटेनगर, भेकराईनगर, कोंढवा बुद्रुक, बिबवेवाडी येथील चैत्रबन परिसर, एरंडवणे येथील एसएनडीटी महाविद्यालय परिसर, कर्वे रस्त्याचा काही भाग, कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीजवळील वसाहत, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे बुद्रुक, पौड फाटा, मेगा सिटी, के ळेवाडी, राजीव गांधी वसाहत, डहाणूकर कॉलनी या भागाचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.