पुणे : हिंजवडी भागात एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून सात तरुणींची सुटका केली. याप्रक रणी पाच दलालांना अटक करण्यात आली.

सुटका करण्यात आलेल्या तरुणी पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, नेपाळ तसेच महाराष्ट्रातील आहेत.

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
tribal farmers protest in nashik,
नाशिक: आदिवासी शेतकरी आंदोलनातील एकाचा मृत्यू; जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव
Nashik Police, visit hospitals, regular patrolling, Fatal Attack, doctor, kailash rathi, panchavati,
नाशिक : आता नियमित गस्तीत पोलिसांची रुग्णालयांनाही भेट; डॉ. कैलास राठींवरील हल्ला, वैद्यकीय व्यावसायिकांना हादरा
Sabyasachi GHosh
Sandeshkhali Row : वेश्याव्यवसाय रॅकेटप्रकरणी भाजपा नेत्याला अटक, अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका

कुमार बलबहाद्दुर प्रधान (वय ४०), रणजित बलबहाद्दुर प्रधान (वय २५), शामसुंदर गंगाबहाद्दूर नेवार (वय २३), बिजू भक्ती शर्मा (वय २२, सर्व मूळ रा. उदालगुडी, आसाम) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी साथीदार बलीराम फौनी गौर (वय २२) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधान, नेवार, शर्मा यांनी हिंजवडी आयटी पार्कपासून वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. परप्रांतातील तरुणींना आमिष दाखवून तेथे वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले जात होते.

गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नरेश बलसाने यांना ही माहिती मिळाली होती. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी शहानिशा करून तेथे सापळा लावला. पोलिसांनी सदनिकेवर छापा टाकून सात तरुणींची सुटका केली.

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय

अटक करण्यात आलेले दलाल व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या युवतींची छायाचित्रे ग्राहकांना पाठवायचे. एखाद्या ग्राहकाने दलालांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तर त्याला ओळखपत्राची मागणी केली जायची. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ओळखपत्राचे छायाचित्र दलालांना पाठवावे लागायचे. खातरजमा झाल्यानंतर दलाल व्यवहार ठरवायचे, असे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी सांगितले.

सदनिका भाडेतत्त्वावर देताना खातरजमा करा

ज्या सदनिकेत वेश्या व्यवसाय सुरू होता. त्या सदनिकाच्या मूळ मालकाची माहिती घेण्यात येणार आहे. सदनिका भाडेतत्त्वावर देताना मालकाने खातरजमा करणे गरजेचे आहे. सदानिकेच्या मालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले.