ऑनलाइन पूर्वनियोजन करण्याच्या सूचना

पुणे : करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू के ली आहे. या काळातही पूर्वनियोजित वेळ आरक्षित करून आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्यास नागरिकांना मुभा आहे. त्याकरिता नागरिकांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने  (यूआयडीएआय) दुवा उपलब्ध करून दिला आहे. त्यावर जाऊन ऑनलाइन पूर्वनियोजित वेळ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

शासनाच्या विविध योजना, रुग्णालये आणि सध्या लसीकरण अशा सर्वच कामांसाठी आधारचा वापर करावा लागतो. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे सुरूच ठेवण्यात आली आहेत. मात्र, त्याकरिता पूर्वनियोजित वेळ आरक्षित करणे आवश्यक आहे. ही सुविधा यूआयडीएआयने यापूर्वीच उपलब्ध करून दिलेली आहे.

सद्य:स्थितीत पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयातील के ंद्रे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, शहरासह जिल्ह्य़ातील टपाल कार्यालये, बँकांमधील आधार नोंदणी व दुरुस्तीची के ंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. पूर्वनियोजित वेळ आरक्षित करताना आपल्या घराजवळची आधार के ंद्रे दिसू शकणार आहेत, त्यानुसार वेळ आरक्षित करून आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे नागरिकांना करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुरुवारी देण्यात आली.

पूर्वनियोजित वेळ कशी आरक्षित कराल?

आधारची कामे करण्यासाठी यूआयडीएआयने  appointments.uidai.gov.in/bookappointment   हा दुवा उपलब्ध करून दिला आहे. या दुव्यावर जाऊन आपले शहर निवडावे. आपल्या शहराचे नाव यादीत नसल्यास शहरातील सध्या सुरू असलेल्या आधार सेवा के ंद्रांच्या पर्यायावर जावे. भारतीय नागरिक या पर्यायावर मोबाइल क्रमांक किं वा ई-मेलच्या साहाय्याने ओटीपी क्रमांक मिळवून आधार कार्डवरील दुरुस्तीचा उल्लेख करावा, त्यानंतर तुमच्या घराजवळील आधार के ंद्रांपैकी एक निवडावे.

टोल फ्री क्रमांकही उपलब्ध

यूआयडीएआयने उपलब्ध करून दिलेल्या दुव्यावर आधार नोंदणी (नवीन आधार काढणे), नाव, पत्ता, मोबाइल, ई-मेल, जन्मतारीख, लिंग आणि बायोमेट्रिक (वापरकर्त्यांचे छायाचित्र, हाताचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग) अद्ययावत करण्याची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच यूआयडीएआयने जवळच्या आधार के ंद्रांची माहिती मिळवण्यासाठी १९४७ हा टोल फ्री क्रमांक जाहीर के ला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर जवळच्या आधार के ंद्रांची माहिती, पत्त्याचा तपशील मिळू शकणार आहे.