News Flash

“पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासात योगदान दिलेल्या सनदी अधिकाऱ्यांची नेमणार समिती”

झोपडपट्टी पुनर्विकासाचा नवा पॅटर्न

(संग्रहित छायाचित्र)

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासात योगदान दिलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन इथला झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याची योजना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आखली आहे. या योजनेबाबत त्यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पुणे तसेच पिंपरी- चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुकत शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, “पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरात ज्या सनदी अधिकाऱ्यांनी यापूर्वी कामं केली आहेत. तसेच शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे, अशा सर्व माजी सनदी अधिका-यांचा सहभाग घेऊन एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये शहराच्या विकासात योगदान देणारे इतर जाणकार मंडळी देखील असणार आहेत.”

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समितीमार्फत झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवीन पथदर्शी मॉडेल तयार करून, त्याला गती दिली जाणार आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्यावतीने झोपडपट्टीवासियांना पुढील काही महिन्यांत ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचे या बैठकीनंतर आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 6:52 pm

Web Title: committee to appoint chartered officers who have contributed to the development of pune pimpri chinchwad aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जितेंद्र आव्हाड अन् त्यांचा वैशिष्टपूर्ण मास्क; चर्चा तर होणारच!
2 महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीबाबत जितेंद्र आव्हाड म्हणतात…
3 पुण्यात जुलै अखेर 18 हजार करोनाबाधित असण्याची शक्यता : शेखर गायकवाड
Just Now!
X