News Flash

नागरिकांना धान्य मिळण्यात अडचणी

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने तीन प्रमुख मागण्यांसाठी १ मेपासून संप सुरू केला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांचा संप; विमा कवच देण्याची मागणी

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमी  वर स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देताना शिधापत्रिकाधारकांच्या हाताच्या बोटाचा ठसा घेण्याची सक्ती राज्य सरकारने शिथिल के ली आहे. त्यामुळे नागरिकांना हाताच्या बोटाचा ठसा न देता धान्य मिळणार आहे. मात्र, दुकानदारांना विमा कवच मिळण्याची मागणी मान्य होईपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांनी बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य स्वीकारण्यात येणार आहे. मात्र, त्याचे वितरण होणार नसल्याने संचारबंदी काळात नागरिकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत.

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने तीन प्रमुख मागण्यांसाठी १ मेपासून संप सुरू केला आहे. त्यामध्ये शिधापत्रिकाधारकांच्या हाताच्या बोटाचा ठसा घेण्याची सक्ती रद्द करावी, धान्य वाटपातील फरक रकमेत (कमिशन) वाढ करावी आणि दुकानदारांना विमा कवच द्यावे या मागण्यांचा समावेश होता. त्यापैकी शिधापत्रिकाधारकांच्या हाताच्या बोटाचा ठसा घेण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य के ली आहे.     याबाबत जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी भानुदास गायकवाड म्हणाले, ‘शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करताना त्यांच्या हाताच्या बोटाचा ठसा द्यावा लागतो. राज्य सरकारने ही अट रद्द के ली आहे.

संप सुरूच राहील

दुकानदारांना विमा कवच देण्याच्या मागणीसाठी संप सुरू ठेवण्यात येणार आहे. करोना काळात नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पाठवण्यात येणारे धान्य दुकानदारांकडून स्वीकारण्यात येणार आहे. मात्र, त्याचे वितरण के ले जाणार नाही. दुकानदार जीव धोक्यात घालून धान्य वाटप करत आहेत. त्यामुळे त्यांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे. आतापर्यंत अनेक दुकानदारांचा करोना संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच राहील, असे महासंघाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:02 am

Web Title: difficulties in getting food grains to the citizens akp 94
Next Stories
1 करोनाच्या दुसऱ्या लाटेचा बासमतीला फटका
2 पूर्वमोसमी पावसाची हजेरी
3 कोट्यवधींची खरेदी संगनमताने
Just Now!
X