News Flash

पुणे : राजभवनातून फाईल गहाळ; शिवसैनिकांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; म्हणाले…

पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन... शोध घेण्यासाठी सूचवला पर्याय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. (संग्रहित छायाचित्र।इंडियन एक्स्प्रेस)

राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या अनेक विषयांपैकी एक म्हणजे विधान परिषदेतील १२ सदस्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षातील १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. पण, राज्यपालांकडून अद्याप या नावांना मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. तर दुसरीकडे एका माहिती अधिकारातून ही फाईलच गहाळ झाल्याची माहिती समोर आलं. त्यामुळे राजकारण आणखीनच पेटलं. फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणात पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. त्यात तपास करण्याबद्दल सल्लाही द्यायला शिवसैनिक विसरले नाही.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राजभवनाकडे विचारणा केली आणि राज्यातील जुन्याच विषयाला पुन्हा नवी फोडणी मिळाली. लगेच शिवसेनेनं त्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच राजभवनातून फाईल गहाळ झाली असल्याची माहिती समोर आली. एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजभवनाने उत्तरं देताना हे सांगितलं. फाईल गहाळ झाल्याचं ऐकल्यानंतर शिवसेनेनं राजभवन आणि भाजपाचा समाचारच घेतला. त्यानंतर फाईल सापडली असल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, फाईल गहाळ झाल्याच्या वृत्तानंतर पुण्यातील शिवसैनिकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्याचबरोबर शोध घेण्यासाठी सल्लाही दिला. विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या नावाची फाईल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र ती फाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आता राजभवन येथे कोण कोण आले होते. हे राजभवन परिसरातील आजअखेर तेथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घ्यावा, जेणेकरून फाईलचा शोध लागण्यास मदत होईल, असं निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, आनंद दवे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले. “आम्ही करोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत जाणे शक्य नसल्याने, आम्ही पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले असून, तपास यंत्रणेच्याद्वारे त्या फाईलचा शोध घ्यावा,” अशी मागणी असल्याचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे बोलताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:46 pm

Web Title: governor nominated mlc 12 mlc file misplace shiv sena bhagat singh koshyari pune police bmh 90 svk 88
Next Stories
1 ‘म्युकोरमायकोसिसची माहिती देण्यासाठी समन्वय  अधिकाऱ्याची नियुक्ती करावी’
2 लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण; पुणे तिसºया क्रमांकावर
3 रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी काळ्या बुरशीबाबत तपासणीच्या रुग्णालयांना सूचना
Just Now!
X