News Flash

‘त्या’ खड्ड्यातील पाण्याची तपासणी करणार

पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यातून गरम पाणी बाहेर पडल्याने उडाली होती खळबळ

थ्री फेज वायरच्या करंटमुळे उकळते पाणी बाहेर पडत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्राजवळील खड्ड्यातून बाहेर पडणाऱ्या उकळत्या पाण्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या खड्ड्यातील पाण्यात दहा सेकंदात प्लास्टिकची बाटली वितळल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अखेर गुरुवारी महापालिकेचे उद्यान अधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. ज्या थ्री फेज वायरमुळे ही घटना घडली ती वायर काढण्यात आली.

त्यामुळे खड्ड्यातून वाहणारे गरम पाणी आता पूर्ववत वाहण्यास सुरुवात झाली. थ्री फेज वायरच्या करंटमुळे उकळते पाणी बाहेर पडत होते, असा निष्कर्ष काढण्यात येत असला तरी खबरदारी म्हणून भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाण्याचे नमुने तपासासाठी नेले आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरीमधील उद्यानातील खड्यातून अचानकपणे गरम पाणी बाहेर पडू लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खड्यातील पाणी एवढं गरम होत की, त्यामध्ये टाकेलेल्या प्लॅस्टिकच्या कोणत्याही वस्तु लगेचच वितळत होत्या. हा सर्व प्रकारमुळे नागरिकांमध्ये उत्सुकतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भोसरी सहल केंद्रातील हा प्रकार पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 6:56 pm

Web Title: hot springs water out issue solved of pimpri chindwad
Next Stories
1 बहुमताने सायकल शेअरिंगच्या योजनेला मंजुरी
2 रिक्षाचालकांची मुजोरी कायम
3 भोसरीतील सहल केंद्रात जमिनीतून गरम पाणी
Just Now!
X