पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 501 नवे करोना रुग्ण आढळल्याने, शहरातील करोना रुग्णांची संख्या आता 13 हजार 654 एवढी झाली आहे.  तर आज दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजअखेर करोनामुळे 545 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या 155 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीस  8 हजार 100 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 105  करोना बाधित रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 55  जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची संख्या हा 2  हजार 134  पोहचली आहे. पैकी, 1 हजार 300 जण करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 62 जणांचा मृत्यू झालेला आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक नोंदवत आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 3  हजार 890 रुग्ण आढळून आले असून, मागील चार दिवसात तिसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून आज दुसऱ्यांदा सर्वाधिक रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.