बेंगळूरुच्या धर्तीवर चाचपणी; लवकरच निर्णय

मुंबई : प्रवाशांना मत्स्यजीवनाचा अनुभव देण्यासाठी आणि स्थानकात रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांचा वेळ आनंददायी जाण्यासाठी बेंगळूरु रेल्वे स्थानक हद्दीतच मत्स्यालय उभारण्यात आले आहे. भारतीय रेल्वे स्टेशन डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन आणि एका खासगी संस्थेकडून उभारण्यात आलेली ही सेवा शुक्र वारपासून प्रवाशांसाठी सुरू  करण्यात आली. बेंगळूरुच्या धर्तीवरच पुण्यातील रेल्वे स्थानकातही ‘मत्स्यालय’ उभारण्याची चाचपणी केली जात आहे.

भारतीय रेल्वे स्टेशन डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशनकडून देशभरातील विविध स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर केला जात आहे. यात प्रवाशांना आकर्षित करणाऱ्या सुविधांचाही समावेश आहे. यासाठी कॉपरेरेशनकडून खासगी कं पन्यांना कामे दिली जात असून त्यातून रेल्वेला भरघोस उत्पन्न मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून बेंगळूरु रेल्वे स्थानकाच्या मोकळ्या आवारात मत्स्यालय उभारण्यात आले आहे. ही सेवा प्रवाशांच्या सेवेत आणली. यासाठी प्रत्येकी २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यात प्रवासी व पर्यटकांसाठी थ्रीडी सेल्फीची सुविधा असून ज्यात मत्स्यालयातून एक मोठा मासा बाहेर येताना दाखविला आहे.

बेंगळूरुमध्ये..

विविध प्रकारचे वन्य वनस्पती, कृत्रिम खडक, शिंपल्या, शार्क, गोगलगाय, कोळंबीसारखे विविध जलचर प्राणी येथील मत्स्यालयात आहेत. यात डॉल्फिनही असून तो सगळ्यांसाठीच आकर्षण ठरणारा आहे. मत्स्यालयाच्या बाहेरील पृष्ठभाग हा काचेचा गोलाकार असून यातून आत प्रवेश करतानाच जलजीवनाचे दर्शन होणार आहे. या मत्स्यालयाला एकाच वेळी २५ जण भेट देऊ शकतात.

होणार काय?  पुण्यात नेमके  मत्स्यालय कोठे उभारणे योग्य ठरेल याबाबतचा सविस्तर अभ्यास करूनच निर्णय घेतला जाणार आहे. मत्स्यालय उभारण्यासाठी लागणारी जागा, त्या स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद इत्यादी मुद्दे मत्स्यालय उभारणीसाठी महत्त्वाचे आहेत.

प्रथमच मत्स्यालयाचा प्रयोग बेंगळूरु रेल्वे स्थानक हद्दीत एका खासगी संस्थेच्या मदतीने करण्यात आला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहूनच पुढे पुणेसह अन्य रेल्वे स्थानक हद्दीतही मत्स्यालय उभारले जाऊ शकते का, याची चाचपणी के ली जाणार आहे.

–  एस.के .लोहिया, व्यवस्थापकीय संचालक, आयआरएसडीसी