नागपूर येथील अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास आणि अमेरिकेतील लाभसेटवार प्रतिष्ठान यांच्यातर्फे प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांना यंदाचा लाभसेटवार साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह येथे ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ व्या शतकात मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाची दिशा आणि दशा बदलत असून ती जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करीत माहिती, उपयुक्तता आणि नव अनुभवाच्या शोधात तंत्रज्ञानाभिमुख होत आहे. याचे भान आपल्या लेखनातून देणाऱ्या गोडबोले यांची डॉ. सुनीलकुमार लवटे आणि सुनील मेहता यांच्या निवड समितीने या पुरस्काराची निवड केली आहे, असे मेहता पब्लिशिंग हाउसचे अनिल मेहता यांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2015 रोजी प्रकाशित
लाभसेटवार साहित्य पुरस्कार अच्युत गोडबोले यांना जाहीर
नागपूर येथील अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास आणि अमेरिकेतील लाभसेटवार प्रतिष्ठान यांच्यातर्फे प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांना यंदाचा लाभसेटवार साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
First published on: 10-01-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Labhsetvar award declared to achyut godbole