पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांसंदर्भात के लेल्या अवमानकारक विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. दरेकर यांनी के लेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

प्रवीण दरेकर यांनी शिरूर येथील एका कार्यक्रमात महिलांबाबत अवमानकारक विधान केले होते. त्यावरून प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी के ली आहे. दरेकर यांच्या विधानावरून त्यांच्या पक्षाची संस्कृती दिसून येत आहे. त्यांच्या बोलण्यातून वैचारिक दारिद्रय़ दिसून येत आहे. माफी न मागितल्यास महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल आम्ही रंगविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रूपाली चाकणकर यांनी दिला.

दरम्यान, शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. दरेकर यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन या वेळी महिला कार्यकर्त्यांनी के ले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते. दरेकर यांनी ४८ तासांत माफी मागितली नाही, तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असताना दरेकर यांनी जे विधान के ले ते निषेधार्थ आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना गालाचा रंग काय असतो हे राष्ट्रवादी काँग्रेस दाखवून देईल, असा इशारा मृणालिनी वाणी यांनी दिला.

दरम्यान, प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव संगीता तिवारी यांनीही या विधानाचा निषेध के ला आहे. घाणरडे राजकारण करताना किं वा प्रसिद्धीसाठी महिलांसंदर्भात के लेली अवमानकारक विधाने खपवून घेतली जाणार नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रात हा प्रकार भूषणावह नाही. यातून त्यांच्या पक्षाचा असंस्कृतपणा पुढे येत आहे, असे संगीता तिवारी यांनी सांगितले.