05 March 2021

News Flash

NDA च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आलेख जैसवाल याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट नाही

आलेख जैस्वालची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातल्या खडकवासाला भागात असलेल्या नॅशनल डिफेन्स अॅकेडमीमध्ये अर्थात एनडीएमध्ये  नेव्हीचं प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षांच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट झालेलं नाही. आलेख जैसवाल हा पाचव्या टर्मचा विद्यार्थी होता अशीही माहिती समोर येते आहे.

याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवासला भागातल्या एनडीएमध्ये आलेख जैसवाल हा २० वर्षांचा विद्यार्थी गेल्या अडीच वर्षांपासून नेव्हीचं प्रशिक्षण घेत होता. आलेख जैसवाल हा मूळचा छत्तीसगडचा रहिवासी होता. मात्र रविवारी संध्याकाळी एनडीएमध्ये असलेल्या आपल्या खोलीत  ५ वाजून १५ मिनिटांनी त्यानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. त्याच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याला हा आत्महत्येचा प्रकार कळताच एनडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि एनडीएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी बोलवलं.

या विद्यार्थ्याला तातडीनं मिलेटरी रूग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्याला डॉक्टरांनी तपासलं असता मृत घोषित केलं. आलेख जैसवाल यानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 9:54 pm

Web Title: nda student commits suicide in hostel room
Next Stories
1 सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा पालकमंत्र्याना झेंडा वंदन करू देणार नाही : रघुनाथ पाटील
2 हिंजवडी जवळच्या खाणीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
3 ‘जीएसटी’ म्हणजे कर दहशतवाद : पी. चिदंबरम
Just Now!
X