News Flash

‘ईव्हीएम’मध्ये घोटाळ्याचा आरोप; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी

पुणे: प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्रात (ईव्हीएम) घोटाळा करून भाजपने निवडणूक जिंकली असल्याचा गंभीर आरोप करत आज शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. महापालिका निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. मात्र, त्यानंतर पराभूत उमेदवारांनी भाजपने मतदान यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वीच विरोधक आणि पराभूत उमेदवारांनी याविरोधात मोर्चा काढला होता. पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. आज, शनिवारी पुन्हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या मोर्चात विविध पक्षांतील पराभूत उमेदवार सहभागी झाले होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रात घोटाळा करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदान यंत्रात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लक्षात घेता महापालिका निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यापुढील निवडणुकांसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:42 pm

Web Title: pmc election 2017 evm scam alleged defeated candidates prakash ambedkar march collector office pune
Next Stories
1 पुण्याच्या आयुक्तांना कचरावेचक महिलांकडून जुन्या शर्टांची भेट
2 मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा
3 झळा या लागल्या जिवा!
Just Now!
X