पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीलाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे पुणे महापालिकेत दोन पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली.

पुणे शहरातील नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी सत्ताधारी भाजपाला विरोधक चांगलेच कोंडीत पकडत आहेत. तर शहरातील अनेक भागात राहणारे नागरिक जादा पैसे मोजून टँकरची मागणी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पहायला मिळत असताना गुरुवारी पुणे महापालिकेतमध्ये दोन पाण्याचे टँकर मागण्याची वेळ आली.

यावर महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा आज पूर्णपणे पाणी पुरवठा बंद असून उद्या सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेत नागरिकांची गर्दी अधिक होत असते आणि पाणी पुरवठा बंद असल्याने आज दोन टँकर मागवावे लागले.