कविता त्या-त्या वयाचा खऱ्या अर्थाने आरसा असतो. त्यात आणि अपरिपक्व असण्यात मजाही असते, असे मत प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी व्यक्त केले.
टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन खरे यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी संगमनाथ दिग्गी, व्ही. सुरेश, विष्णूपंत नेवाळे, सुभाष हुलावळे, बबन चव्हाण, सुरेंद्र गाडगीळ, बाबा राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खरे म्हणाले, कविता ठरवून करता येत नाही. अगदी झोपेतही कविता सुचू शकते, त्यासाठी कसलाही नियम नाही. कविता सुचल्यावर आळस केल्यास ती पुन्हा सुचत नाही. कमी लिहिणे आणि जास्त निरीक्षण करण्याने कविता होत राहिल्या. प्रेक्षकांना कवितेशी बोलायचे असते. मात्र, कवितेशी बोलता येत नाही म्हणून ते कवीशी बोलत असतात. कलेला राजाश्रय असावा लागतो, तो टाटा मोटर्सने ‘कलासागर’च्या माध्यमातून दिला आहे. प्रसन्न हळबे यांनी सूत्रसंचालन केले. सुशील राणे यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2013 रोजी प्रकाशित
कविता म्हणजे आरसाच – संदीप खरे
कविता त्या-त्या वयाचा खऱ्या अर्थाने आरसा असतो. त्यात आणि अपरिपक्व असण्यात मजाही असते, असे मत प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी व्यक्त केले.
First published on: 28-10-2013 at 02:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poits means mirror sandeep khare