पुणे आणि चितळे बंधू हे जणू समिकरणच झालं आहे. दुपारचे बंद दुकान हा पुण्यातील चितळे बंधूंबद्दल बोलताना कायमच चेष्टेचा विषय असल्याचे पहायला मिळतं. मात्र २०१७ च्या सुरुवातीलच  ‘चितळे बंधू’ यांनी दुपारी एक ते चार दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आजही अनेकदा चितळे बंधूंना यावरुन ट्रोल केलं जातं. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चितळे बंधू चर्चेत आहेत ते एका चांगल्या उपक्रमासाठी. चितळे बंधू समुहाने कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याचं भूमिपूजन रविवारी पार पडलं. यासंदर्भातील माहिती चितळे समुहाचे इंद्रनील चितळे यांनीच ट्विटरवरुन दिलीय.

नक्की वाचा >> बाकरवडी की भाकरवडी?; चितळे बंधूंनीच दिलं उत्तर

इंद्रनील यांनी रविवारी दुपारच्या सुमारास ट्विटरवरुन एक फोटो पोस्ट करत या इमारतीसंदर्भातील माहिती दिली. आमच्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संकुलाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम काल झाला. करोनामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वसामावेशक काम करत राहण्यासाठी चांगल्या सोयी उभारण्यासाठी प्रेरित केलं आहे. आज सुरक्षित वातारवणाची गरज असताना ही नवी इमारत कर्मचाऱ्यांना सुरक्षित पद्धतीची मोठी निवासस्थानाची उपलब्ध करुन देतील, असा विश्वास इंद्रनील यांनी व्यक्त केलाय.

हा प्रकल्प कसा असेल यासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली नसली तरी इंद्रनील यांच्या या ट्विटवर अनेकांनी त्याचं आणि कर्मचाऱ्यांचा विचार करणाऱ्या चितळे बंधू कंपनीचं अभिनंदन केलं आहे. कर्मचाऱ्यांसाठी चितळेंनी पुढाकार घेतला असला तरी चितळे हे नाव ठाऊक नसणारा पुणेकर सापडणं मुश्कीलच, असंही म्हटलं जातं.

नक्की वाचा >> “माझ्याकडे ‘चितळे बंधूं’वर जोक आहे पण…”; ट्रोल करणाऱ्याला चितळेंकडून ‘पुणेरी टोमणा’, म्हणाले…

चितळेंची लोकप्रियता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शास्त्रीय संगीतात जशी गाण्यात घराणी असतात, तशी खाण्याची घराणी असती तर त्यातलं ठळक नाव असतं ‘चितळे’ घराणं. चितळे म्हणजे विशिष्ट शैली. चितळ्यांच्या घराण्यानं पदार्थांना खास चव, दर्जा दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तीनचार पिढ्यांनंतरही टिकवून ठेवल्याने आज केवळ महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात चितळेंच्या प्रोडक्ट्सला चांगली मागणी आहे. या घराण्याच्या चवीचं व्याकरण निर्माण केलं भास्कर गणेश चितळे यांनी १९२० मध्ये. सातारा जिल्हय़ातल्या या छोटय़ाशा गावात सुरू झालेल्या आणि १९३९ मध्ये सांगली जिल्हय़ातल्या ‘भिलवडी’त स्थलांतरित झालेल्या दुधाच्या घरगुती व्यवसायाचं बघता बघता प्रचंड मोठ्या उद्योगात रूपांतर झालं. प्रतितास तीनशे किलो या हिशोबानं दररोज साडेचार टन बाकरवडी तयार होते. दसरा-पाडवा वा कुठलाही सण, पुणेकरांना चितळेंच्या दुकानात जायला जणू पर्याय नसावा असं चित्र.