News Flash

कैदी संजय दत्त येरवडामध्ये रंगीत तालीम करतो तेव्हा..

पुण्यातील येरवडाच्या तुरूंगात बंद असलेल्या संजय दत्तची पहिली दृश्ये समोर आली आहेत.

| September 21, 2013 12:46 pm

पुण्यातील येरवडाच्या तुरूंगात बंद असलेल्या संजय दत्तची पहिली दृश्ये समोर आली आहेत. येत्या २६ सप्टेंबर रोजी संजय दत्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंचावर होणाऱया सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणार आहे. त्यासाठीची रंगीत तालीम करताना संजय दत्त कॅमेरात कैद झाला. येरवडा तुरूंगात संजय दत्त कार्यक्रमाची रंगीत तालीम करत आहे.
त्याच्या तालीमीवरून या कार्यक्रमात ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटातील मुन्नाभाईचीच भुमिका संजय दत्त साकारणार असल्याचे दिसत आहे.
येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम तयार केला आहे. आधुनिक काळातही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे महत्त्व सांगणारा हा कार्यक्रम कैद्यांनी तयार केला आहे. यामध्ये नाटिका आणि नृत्य बसविण्यात आले आहेत. परदेशात राहणारा भारतीय व्यक्ती त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटतो व आपल्या संस्कृतीची माहिती जाणून घेतो, असा या कार्यक्रमाचा गाभा आहे. त्याचे संवाद, नृत्य दिग्दर्शन आदी सर्व कैद्यांनीच केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2013 12:46 pm

Web Title: sanjay dutt rehearsal in yerwada
Next Stories
1 छोटय़ा घरांसाठी जागा सोडण्याचे बंधन रद्द
2 पिंपरी पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद नढे –
3 मावळ जलवाहिनी प्रकल्पामुळे ७०० कोटींचा भरुदड; सीबीआय चौकशीची मागणी
Just Now!
X