X
X

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद

READ IN APP

वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत लागू राहणार आहेत

वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग योजना

पुणे : विसर्जन मिरवणुकीनिमित्त रविवारी (२३ सप्टेंबर) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गासह शहरातील सतरा प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत लागू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका) वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर नागरिकांनी वाहने लावू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

विसर्जनासाठी बंद राहणारे प्रमुख रस्ते पुढील प्रमाणे- शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक), लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते टिळक चौक), बगाडे रोड (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), बाजीराव रस्ता (बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक), कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे मिठाईवाले), गणेश रस्ता (दारूवाला पूल ते जिजामाता चौक), केळकर रस्ता (बुधवार चौक ते टिळक चौक), गुरू नानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक), टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक), जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), फग्र्युसन रस्ता (खंडोजीबाबा चौक ते फग्र्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार), पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक)

वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग योजना

वाहतूक पोलिसांकडून विसर्जनानिमित्त यंदाही वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग योजना तयार केली आहे. वर्तुळाकार मार्ग पुढीप्रमाणे- कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संचेती रुग्णालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कबीर चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्ता, गुलटेकडी, मार्केट यार्ड, सातारा रस्ता, होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, लालबहाद्दुर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक.

वाहने लावण्याची पर्यायी ठिकाणे

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे – एच. व्ही. देसाई महाविद्यालय, बुधवार पेठ, पुलाची वाडी, नदीपात्र रस्ता, पुरम चौक ते हॉटेल विश्व, दारूवाला पूल ते खडीचे मैदान चौक, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, काँग्रेस भवन, जयवंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा, नारायण पेठ.

24
X