दहावीच्या पुनर्परीक्षेचे अर्ज १० जूनपासून उपलब्ध होणार असून परीक्षा १८ जुलैला सुरू होणार असल्याचे राज्यमंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची पुनर्परीक्षा ऑक्टोबर ऐवजी जुलैमध्ये घेण्यास शासनाने गेल्या वर्षीपासून सुरुवात केली. या परीक्षेचे अर्ज शुक्रवार, १० जूनपासून उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २१ ते २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांच्या माध्यमातून अर्ज भरावेत असे आवाहन राज्यमंडळाने केले आहे. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले किंवा श्रेणीसुधार करू इच्छिणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतात. राज्यमंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि अर्ज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरून सादर करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 12:47 am