News Flash

पुणे : सुरेश कलमाडी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

चक्कर येऊन पडल्याने कलमाडी रुबी हॉस्पिटलमध्ये

(सुरेश कलमाडी यांचं संग्रहित छायाचित्र)

पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आज दुपारी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चक्कर आल्यामुळे पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कलमाडी यांना रुग्णालयात दाखल केल्याचं समजताच त्यांच्या अनेक समर्थकांनी हॉस्पीटलजवळ गर्दी केली होती. प्राथमिक माहितीनुसार, कलमाडी यांच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याचं समजतंय. न्यूरोलॉजी विभागातून त्यांना सहाव्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने कलमाडींना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कलमाडींचं निलंबन मागे घेतलं जाणार असल्याचीही अलीकडील काळात चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 7:27 pm

Web Title: suresh kalmadi admitted in pune ruby hospital
Next Stories
1 इम्पॅक्ट : दापोडीतील पाणीपुरी व्यवसाय करणाऱ्यांवर FDIची धाड
2 जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट
3 पर्यावरणपूरक वस्तूंचा ‘इको बझार’!
Just Now!
X