पुण्यातील गणेश पेठेत तीन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पूर्ववैमन्यस्यातून हे हत्याकांड घडले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Pune: Bodies of three people including a minor found near Ganesh Peth; Bodies sent for postmortem, more details awaited.
— ANI (@ANI) February 23, 2018
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे शहरातील समर्थ आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नागझरी नाल्याजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास १२ ते २१ वयोगटातील तीन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहांची पाहणी केली. या तरुणांच्या अंगावर एकही कपडा नसल्याने त्यांची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत आहेत. हे तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.