News Flash

टॉम अल्टर ‘एफटीआयआय’मधून बाहेर

राजीनामा परत घेण्यासाठी प्रशासनाकडून अल्टर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांनी ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’मधील (एफटीआयआय) अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. इतर कामातील व्यस्ततेमुळे आपण संस्थेला वेळ देऊ शकत नाही, असे कारण अल्टर यांनी संस्थेला ई-मेल केलेल्या राजीनाम्यात दिल्याची माहिती संस्थेतील सूत्रांनी दिली. परंतु विद्यार्थ्यांशी पटत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.  अल्टर नोव्हेंबर २०१४ मध्ये अभिनय विभागप्रमुख म्हणून रुजू झाले होते. राजीनामा परत घेण्यासाठी प्रशासनाकडून अल्टर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 4:16 am

Web Title: tom alter resigns as head of pune ftii acting department
टॅग : Ftii
Next Stories
1 वानवडीत भरदिवसा घरफोडी
2 टिळकांनी राजकीय दृष्टिकोनातून मराठी घडविली-डॉ. सदानंद मोरे
3 न्यायालयीन निर्णय, पर्यावरणवाद्यांमुळेच द्रुतगतीवर बळींच्या संख्येत वाढ-डी.एस.कुलकर्णी
Just Now!
X