आळंदीत घाण करायला पाकिस्तानातून लोक येतात का? असा प्रश्न विचारत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आळंदीतल्या अस्वच्छतेकडे लक्ष वेधलं आहे. आपलेच लोक इथे घाण करतात. त्यांनी शिस्त पाळली तर आळंदी स्वच्छ होईल. स्वच्छतेची जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे. असंही दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. ” मी वारकरी संप्रदायाला विनंती आहे. तुम्हीही स्वच्छता मोहिमेत लक्ष घाला. हे तुमचं माझं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ झाली पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं. दिलीप मोहिते पाटील बोलत असताना मंचावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह इतर दिग्गज उपस्थित होते.

आमदार मोहिते पाटील म्हणाले, ढोक महाराजांनी विषय मांडला इंद्रायणी स्वच्छ झाली पाहिजे. माझी या निमित्ताने सगळ्या वारकऱ्यांना विनंती राहणार आहे. इंद्रायणी स्वच्छ झाली पाहिजे. पण, इंद्रायणी घाण कोण करतंय कोण? वारकरी संप्रदायातील मंडळींना विनंती आहे. की, इथं मोठं मोठी शौचालयं आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. ती स्वच्छ करणंही आपली जबाबदारी आहे.  आळंदीत पाकिस्तानातून येऊन कुणीही घाण किंवा अस्वच्छता पसरवत नाही. त्यामुळे शिस्तीच पालन केलंच पाहिजे दिलीप मोहिते यांनी म्हटलं आहे.

शासन पैसे देण्याचे काम करेल. सुविधा निर्माण करण्याचे काम करेल. अनेक ठिकाणी आपण स्वच्छतागृहं उभारली आहेत. त्यांची काळजी घेण्याची, निगा राखण्याची जबाबदारी आपलीच आहे असंही मोहिते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमदारांच्या बोलण्यावर उपस्थितांनी नाराजी दर्शवली आमदारांचं अचानक भाषण सुरू असताना उपस्थितांनी टोकले. इंद्रायणी नदी अस्वच्छतेचं काम फक्त आळंदीकरच नाही तर देहूतले रहिवासीही करतात. पिंपरीकरही त्यात आहेत. असं जेव्हा मोहिते म्हणाले तेव्हा उपस्थित शांत झाले.