पालकमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांना वळसा घालणाऱ्या नियोजित वर्तुळाकार रस्ता प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना चारपट मोबदला दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांचे समाधान करू, असेही त्यांनी सांगितले.

वर्तुळाकार रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पश्चिम मार्गाची मोजणी प्रगतिपथावर असून पूर्व मार्गाची मोजणी प्रशासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना सद्य:स्थिती आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री पवार म्हणाले, ‘वर्तुळाकार रस्त्यामुळे जमीन जात असली, तरी चारपट मोबदला दिला जाणार असल्याने प्रकल्पबाधित दुसरीकडे जागा घेऊ शकतात. हा प्रकल्प आता झाला नाही, तर त्याची किं मत आणखी काही कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पुढील ५० वर्षांचे नियोजन करून साकारण्यात येत आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, नगर आणि रायगड या सर्व जिल्ह्य़ांतून वाहने पुण्यात येतात. ज्यांचे पुण्यात काम नाही, त्यांनी या वर्तुळाकार रस्त्यावरून बाहेरच्या बाहेर पुढे मार्गस्थ झाल्यास पुण्यात वाहतूककोंडी कमी होणार आहे.’     दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमधील लोकसंख्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्य़ांचा विचार करता या प्रकल्पाची नितांत गरज आहे. विरोध करणाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांचे समाधान करण्यात येईल. योग्य मोबदला देऊन भूसंपादन करू. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत वाहतूककोंडी होऊ नये म्हणून हा प्रकल्प आणि वाघोली ते शिक्रापूर असा काही हजार कोटींचा उड्डाणपूल करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे आरेखन तयार होत आहे, असेही पवार यांनी सांगितले.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा