महापालिकेला दिल्या जाणाऱ्या पाणी कोटय़ात कपात करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय

पुणे : भामा-आसखेड योजना पूर्ण झाल्यामुळे धरणातून उचलण्यात येणाऱ्या वार्षिक २. ६४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला दिल्या जाणाऱ्या पाणी कोटय़ात २.६४ टीएमसीने कपात के ली जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून तेंव्हा करार झाला होता. अद्याप सुधारित करार झालेला नाही. त्यामुळे धरणातून पाणी कमी मिळण्याचा प्रश्नच नाही, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना आहे. सध्या योजनेची कामे पूर्ण झाली असून जलवाहिन्यांची तांत्रिक चाचणी महापालिके कडून करण्यात आली आहे. अंतिम चाचणी पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्यापर्यंत पूर्व भागाला योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे.

सध्या या पूर्व भागाला लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी दैनंदिन चारशे एमएलडी पाणी खडकवासला प्रकल्पातून बंद जलवाहिनीद्वारे लष्कर जलके ंद्रात आणण्यात येत आहे.  योजना कार्यान्वित झाल्यानंतर लष्कर जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद होणार असून थेट भामा-आसखेड धरणातूनच या भागाला पाणीपुरवठा होणार आहे. मात्र पाणीपुरवठय़ावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद निर्माण होणार आहे.

महापालिके ने भामा-आसखेड धरणातून पाणी घेण्यास सुरुवात के ल्यानंतर खडकवासला धरणातील पाणीकोटय़ात कपात करण्यात येईल. त्याबाबतचा करारनामा झाला आहे, असा दावा जलसंपदा विभागाने के ला आहे. किमान २.५० टीएमसी पाणी कपात करण्यात येणार असून त्याबाबत महापालिके ला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. महापालिके नेही त्याला होकार दर्शविला आहे, असा दावा जलसंपदा विभागाने के ला आहे.

दरम्यान, सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून या भागाला पाणीपुरवठा करण्याचा करार करण्यात आला होता. शहराची लोकसंख्या वाढली आहे. ती ५५ लाख असल्याचे महापालिके ने सिद्ध के ले आहे. वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन शहराचा पाणीकोटा वाढविण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिके ने यापूर्वीच दिला आहे. सध्या १८ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. या परिस्थितीत खडकवासला धरणातील पाण्यामध्ये कपात करण्याचा प्रश्नच येत नाही. तसा सुधारित करारही झालेला नाही, असे महापालिके कडून स्पष्ट करण्यात आले.

लष्कर जलकेंद्रातून पूर्व भागाला होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर हे पाणी हडपसर भागात वळविण्याचा घाटही घातला जात आहे. भाजपच्या नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी तशी मागणी के ली आहे. दरम्यान, समान पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या सुरू आहेत. लष्कर जलकेंद्रातील पाणी अन्य भागासाठी वापरण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज ८९२ दशलक्ष घनफूट (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. मात्र, पाणीपुरवठा करताना तब्बल ३९ टक्के  पाण्याची गळती होत असल्याने महापालिके कडून खडकवासला धरणातून दररोज १४०० एमएलडीपर्यंत पाणी घेण्यात येते. मात्र, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला धरणातून उचलण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यात कपात करावी लागणार आहे.

– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

पाणीकोटा वाढवून द्यावा, अशी महापालिके ची मागणी आहे. आसपासच्या पाच किलोमीटर परिघातील गावांना महापालिके ला पाणीपुरवठा करावा लागतो. पाणीकपातीसंदर्भात कोणताही सुधारित करार झालेला नाही. त्यामुळे पाणीकपातीचा प्रश्नच येत नाही. लष्कर जलके ंद्रातील पाणी अन्य भागाला दिले जाईल. शहराची लोकसंख्या किती आहे, हे महापालिके ने सिद्ध के ले आहे.

– सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, महापालिका