24 January 2020

News Flash

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनंतर आता भानुप्रताप बर्गेही करणार शिवसेनेत प्रवेश?

दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी ते इच्छुक आहेत.

मुंबई : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता पुण्यातून सहाय्यक पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झालेले एन्काऊन्टर स्पेशालिस्ट भानुप्रताप बर्गे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, त्यांनी नुकतीच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी ते इच्छुक असल्याचे कळते.

दरम्यान, बर्गे यांना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी काही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची पुण्यातील हॉटेल वैशाली येथे नुकतीच बैठक झाली. यावेळी या अधिकाऱ्यांनी बर्गेंची उमेदवारी मिळवण्याला ‘चायना गेट‘ मिशन असे संबोधले तसेच त्यांच्या सारख्या एका चांगल्या अधिकाऱ्याला संधी मिळाली पाहिजे, अशी भुमिका मांडली. त्यासाठी सर्वप्रकारची मदत करण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आला. बर्गे यांच्या नावाच्या एका फेसबुक पेजवर ही माहिती देण्यात आली आहे.

याच फेसबुक पेजवरुन काही दिवसांपूर्वी पोलच्या माध्यमांतून जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पोलला सुमारे दीड हजार युजर्सने प्रतिसाद देत आपले मत नोंदवले होते. यामध्ये ७५ टक्के लोकांनी बर्गे यांच्या राजकारणातील प्रवेशास संमती दर्शवली होती तर २५ टक्के लोकांना त्यांनी राजकारणात जाऊ नये असेही सुचवले होते. साधारण २२ ऑगस्ट रोजी हा कल जाणून घेतल्यानंतर बर्गे यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

First Published on September 17, 2019 1:56 pm

Web Title: will bhanupratap barge also join shiv sena after encounter specialist pradeep sharma joins aau 85
Next Stories
1 पाच महिन्यांत ७१ हजार फुकटे प्रवासी!
2 रथांमुळे वाहतुकीला अडथळा
3 संपूर्ण शहरात गुरुवारी पाणी नाही
Just Now!
X