27 February 2021

News Flash

पुणे : तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस

तरुणावर उपचार सुरू

एकतर्फी प्रेमातून तरुणाने पोलीस ठाण्यासमोरच हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  घटना पुण्यात घडली आहे. ही घटना आज सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यासमोर घडली आहे. रोहित अमित पटोवाल (वय २८) अस आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील कात्रज येथे रोहित राहत असून यवतमाळला शिक्षण घेण्यासाठी तो गेला होता. तेव्हापासून त्याच एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. दरम्यान, गुरुवारी सकाळी रोहित हा प्रेयसीच्या ऑफिसमध्ये गेला होता. त्याला तिच्याशी बोलायचं होत. त्यानं तस तिला हावभाव करून सांगितलं. मात्र, तिने बोलण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या रोहितनं ब्लेडने नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ऐन हिंजवडी पोलीस ठाण्यासमोरच रोहितनं नस कापून घेतली.  रोहित हा संबंधित तरुणीवर १२ वीत असल्यापासून एकतर्फी प्रेम करतो आहे. तो मूळ अमरावतीचा असून प्रेयसी ही यवतमाळ ची आहे. जखमी रोहितच्या वडिलांना संबंधित घटनेची माहिती दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 7:57 pm

Web Title: youth trying to commit suicide in pune bmh 90
Next Stories
1 पुणे: लग्नाला नकार दिलास तर वडिलांना ठार मारीन, पोलिसाकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार
2 पुणे: कोकणातून नव्हे थेट आफ्रिकेतून आला हापूस, मार्केटयार्डात दाखल
3  आधारकोंडी फुटली
Just Now!
X