पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात गंभीर गुन्हे करणाऱ्या १२ सराईत गुन्हेगारांना परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले. सूरज ताजमोहंमद सिद्दीक (वय २०, रा. गुलटेकडी), विवेक बाबुराव चोरगे (वय २३, रा. बालाजीनगर, धनकवडी), धीरज रंगनाथ आरडे (वय २५, रा. पद्मावती), गणेश सुनील मोरे (वय २६, रा. धनकवडी), किरण वामन जगताप (वय २५, रा पद्मावती), तानाजी राजाभाऊ जाधव (वय ३८, रा. संतोषनगर, कात्रज), प्रदीप रामा जाधव (वय २९, रा. जांभुळवाडी, कात्रज), गणेश विजय भंडलकर (वय २१, रा. कात्रज), आदित्य उर्फ दिनेश युवराज ओव्हाळ (वय २२, रा. कोरेगाव पार्क), सागर कल्याण माने (वय ३०, रा. कोरेगाव पार्क), अरबाज हसन कुरेशी (वय २३, रा. जाफरीन लेन, लष्कर), रोहन मल्लेश तुपधर (वय २३, रा. ताडीवाला रस्ता) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांविरुद्ध स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, लष्कर, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गुन्हेगारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, विनयभंग, दरोडा, सरकारी कामात अडथळा, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सराइत गुन्हेगारांवर यापुढील काळात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखली ही कारवाई करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 criminals nabbed in pune print news rbk 25 amy
First published on: 06-06-2023 at 18:36 IST