पुणे: मैत्रिणीने प्रेमसंबंध तोडल्याने एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

अल्पवयीन मुलगा येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात राहायला होता. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध होते. मुलीने त्याला झिडकारुन प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. अल्पवयीन मुलगा आजीच्या घरी आला होता. तेव्हा त्याने अल्पवयीन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत; पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीला वाचवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीने त्याला शिवीगाळ केली. अपमान झाल्याने अल्पवयीन मुलाने आजीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करत आहेत.