सोसायटीच्या पार्किंगमधून १८ लाखांची फॅार्च्युनर ही महागडी मोटार चोरट्यांनी लांबविल्याची घटना पर्वती परिसरात घडली.

याबाबत सुरेंद्र वीर (वय ४७, रा. अष्टविनायक सोसायटी, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मीनगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरासमोर अष्टविनायक सोसायटी आहे. वीर यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांची महागडी मोटार लावली होती. मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. मोटार लांबवून चोरटे पसार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव तपास करत आहेत.