पिंपरी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात वाढलेले तापमान, सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने पिंपरी-चिंचवडकर घामाघूम झाले असताना मंगळवारी (१६ एप्रिल)  सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यामुळे शहरात २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा >>> पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. दिवसभर नागरिक घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघत आहे. परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. दुपारचे तापमान ४० ते ४२अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे.  दुपारी बाहेर फिरताना नागरिक चांगलेच घामाघूम होत आहेत. शहरात मंगळवारी दुपारचे तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वल्लभनगरसह आदी भागात  वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. शहरात २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.अग्निशमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे हटविण्याचे काम सुरू होते. एक ठिकाणी आग, एका ठिकाणी ऑईल गळती झाली. अग्निशमन पथके शहरात विविध ठिकाणी कार्यरत असल्याचे अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले.