पुणे : मराठी दौलतीची शान आणि प्रसंगी अटकेपार झेंडे लावणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडून रविवारी वास्तूचा २९१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

भव्य रांगोळी, सनई चौघड्यांचे सूर, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करीत शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार वाड्याचा २९१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, विद्याधर नारगोलकर, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, उमेश देशमुख आणि पेशवे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – राज्यातील महिला कारागृहे भरली तुडुंब, क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी

हेही वाचा – पुणे : सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, भोर तालुक्यातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेटे म्हणाले, शनिवार वाड्याची वास्तू म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा शाहीर आहे. बाजीराव पेशवे यांनी पुण्याला राजधानी करण्याचा निर्णय घेतला आणि देखणा शनिवार वाडा बांधला. परंतु, या वाड्याचा उपभोग घेण्यासाठी बाजीराव पेशवे येथे थांबले नाहीत. ते सतत रणांगणावर लढले ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठ्यांचा इतिहास माहीत होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याची गरज आहे, अशी भावना भूषण गोखले यांनी व्यक्त केली.