सावकाराच्या जाचामुळे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोर तालुक्यातील कुरुंगवडी गावात घडली. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३, रा. कुरुंगवडी, ता. भोर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिळीमकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच बेकायदा सावकारी प्रकरणी अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड, ता. भोर, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हेही वाचा – राज्यातील महिला कारागृहे भरली तुडुंब, क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी

सतीश शिळीमकर यांची पत्नी वैशाली यांनी या संदर्भात राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमृतने सतीश यांना व्याजाने पैसे दिले होते. अमृत त्यांना व्याजासाठी त्रास देत होता. अमृतने त्यांच्याकडे २८ लाख रुपयांची मागणी केली होती. अमृतचा तगादा आणि धमक्यांमुळे सतीश यांनी शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतला.

हेही वाचा – कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी

अमृतने शेतजमीन नावावर करून देण्याची मागणी केली होती. त्याच्या धमक्यांमुळे पती सतीश यांनी आत्महत्या केल्याचे वैशाली शिळीमकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय सुतनासे तपास करत आहेत.