पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लहान, मोठे १५ हजार उद्योग व्यवसाय आहेत. मात्र, त्यातील काही उद्योगांना गेल्या १७ तासांपासून ब्रेक लागल्याचे चित्र आहे. कारण, गेल्या १७ तासांपासून सेक्टर नंबर सात येथील वीज गेल्याने याचा थेट परिणाम ३५० उद्योगावर झाला आहे. यामुळं ७० ते ८० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केला आहे.

करोनानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग धंद्यांनी वेग पकडला होता. सर्व काही सुरळीत असताना भोसरी MIDC मधील वीज गायब होत आहे. याचा थेट फटका उद्योजकांना बसत असल्याने बेलसरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या १७ तासांपासून भोसरी MIDC च्या सेक्टर नंबर सात मधील वीज गेलेली आहे.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबतचा अहवाल गुरुवारी सादर होण्याची शक्यता ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचा ३५० उद्योगांना फटका बसला असून विजेविना उद्योग बंद आहेत. या अगोदर मार्च महिन्यात देखील अशाच प्रकारे वीज गायब झाली होती. यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली आहे.