पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता अंधारे यांनी वाघमारे यांना बदनामी केल्याबाबत पाच कोटी रुपये नुकसान भरपाईची नोटीस बजाविण्यात आली आहे.
अंधारे यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रिया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांच्या मार्फत वाघमारे यांना नोटीस बजावली आहे. अंधारे यांच्यावर वाघमारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांची जाहीर बदनामी केली आहे. वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत ठोस पुरावे सादर करावेत. अंधारे यांच्याविषयी केलेली अपमानास्पद वक्तव्ये मागे घ्यावीत. लेखी माफीनाम्याची प्रत पाठवावी.
अन्यथा पाच कोटी रुपायंचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला जाईल. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत उत्तर पाठवावे, असे नोटीशीत म्हटले आहे. समाजमाध्यमात बदनामीकारक आणि स्त्रीत्वाचा अपमान करणारा मजकूर आणि ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. संबंधित ध्वनिचित्रफीत काढून टाकण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे.