पिंपरीत सात वर्षांच्या मुलीची हत्या, तीन दिवसांपासून होती बेपत्ता

पिंपरीत राहणारी ७ वर्षाची मुलगी  सोमवारी राहत्या घराजवळून बेपत्ता झाली होती. मुलीचे आई – वडील घरातून बाहेर गेले होते. मुलगी त्यांच्याच मागे गेली.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पिंपरीत सोमवारपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीची हत्या करण्यात आली असून मुलीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यच्या आधारे तपास करत असून हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाले होते का?, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

पिंपरीत राहणारी ७ वर्षाची मुलगी  सोमवारी राहत्या घराजवळून बेपत्ता झाली होती. मुलीचे आई – वडील घरातून बाहेर गेले होते. मुलगी त्यांच्याच मागे गेली. मात्र, आई – वडिलांना ती आपल्या मागे आल्याचे लक्षात आले नाही. यानंतर ती बेपत्ता झाली. हा प्रकार लक्षात येताच आई -वडिलांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. परिसरात शोध घेतल्यानंतर आई – वडिलांनी शेवटी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली.

गुरुवारी सकाळी एच ए कंपनीच्या मैदानावर मुलीचा मृतदेह आढळला. एका नागरिकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी याची माहिती मुलीच्या आई वडिलांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून यातील एका कॅमेऱ्यात मुलीच्या शेजारी राहणारा व्यक्ती तिला घेऊन जात असल्याचे कैद झाले आहे. मुलीवर अत्याचार झाले होते का?, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली. संशयित आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 7 year old missing girl found dead murder case registered in pimpri

ताज्या बातम्या