पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागातील रस्ता खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्यांतून आणि चार राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सुमारे ६६ किलोमीटर लांबीचा आहे. नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग आणि पुणे रिंगरोड १२ गावांतून एकत्र जाणार आहे.

हेही वाचा – पिंपरी : मराठा आंदोलकांनी किवळेत रस्ता रोखला

हेही वाचा – पिंपरी : मोटारीच्या छतावर बसून ‘स्टंटबाजी’ करणारे दोघे अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मार्गिकेला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली असून त्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आले आहेत. हा रस्ता पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे ब्रदुक येथून सुरू होऊन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से येथे येऊन मिळणार आहे. केंद्राने पुणे-छ. संभाजीनगर हा ग्रीन कॉरिडॉरची घोषणा केली आहे. २८६ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून तो एमएसआरडीसीच्या रिंगरोडला येऊन मिळणार आहे. पूर्व भागातील १२ गावांतून हे दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहे. हे अंतर ३१ कि.मी. एवढे आहे. त्यामुळे या १२ गावांतील रस्त्याचे काम एनएचएआयने करावे, त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनी करावा, असा प्रस्ताव होता. त्यामुळे वर्तुळाकार रस्त्यासाठी या १२ गावांतील जमीन संपादित करणे आणि मार्गिका विकसित करण्यासाठी येणारा अंदाजे पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च हा देखील एनएचएआयने करावा, असे ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा खर्च वाचणार आहे.