पुण्यात भवानी पेठेतील वाड्याला आग; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू | A fire broke out at the palace in Bhawani Peth in Pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुण्यात भवानी पेठेतील वाड्याला आग; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात जुन्या वाड्याला रात्री लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

fire in pune
पुण्यात भवानी पेठेतील वाड्याला आग; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात जुन्या वाड्याला रात्री लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्येष्ठ नागरिक वाड्यात एकटा राहत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

हेही वाचा >>>पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

निलेश ठक्कर (वय ७०, रा. मणीभवन वाडा, पालखी विठोबा चौक, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पालखी विठोबा चौकात मणीभवन जुना लाकडी वाडा आहे. वाडा दुमजली आहे. सध्या वाड्यात कोणी राहत नाही. ठक्कर वाड्यात एकटेच राहत असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. रात्री साडेअकराच्या सुमारास वाड्यात अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. केंद्र प्रमुख गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

हेही वाचा >>>चार वर्षांची पदवी जूनपासून, अभ्यासक्रमाचा मात्र पत्ताच नाही! ; आराखडय़ासाठी फेब्रुवारीअखेपर्यंत मुदत

जवानांनी वाड्याची पाहणी केली. तेव्हा वाड्यातील स्वच्छतागृहात निलेश ठक्कर बेशुद्धावस्थेत सापडले. जवानांनी त्यांना तातडीने ससून रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 09:56 IST
Next Story
पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा