पुणे: मार्केट यार्ड भागातील डाॅ. आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी दुपारी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मार्केट यार्ड परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकगर झोपडपट्टी आहे. या भागात दाट वस्ती आहे. गल्ली क्रमांक ११ मधील झोपड्यांना दुपारी चारच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब, एक टँकर घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा… येरवडा कारागृहातून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यापूर्वी डाॅ. आंबेडकरनमगर परिसरात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.