डॉ. दीपक शिकारपूर

Loksatta Pune Vardhapan 2023 : २०२३ आता सुरू झाले आहे. आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे; माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत आता ‘तेला’ची जागा घेतली आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणं आज चैन नसून गरज होत चालली आहे. यंत्रमानव व मानव ह्यामधील दरी आगामी शतकात कमीकमी होणार आहे. ‘ऑटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रं होत चालली आहेत. संगणकाचा अवतार ज्या गतीने बदलत गेला त्यापेक्षाही वेगाने, गेल्या पाच वर्षांत, सेलफोनचे रूप आणि अंतरंग बदलले आहे हे निश्चितच. किंबहुना सेलफोनच्या हँडसेटचे अधिकाधिक संगणकीकरण झाल्यामुळे असे झाले आहे असे म्हणता येईल.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
without btech or engineering diploma degree you can do these technical jobs see list an salary
BTech इंजिनिअरिंग पदवी न घेता करू शकता टेक्निकल क्षेत्रातील ‘या’ नोकऱ्या, कोर्स अन् पगाराबाबत घ्या जाणून
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : दिशा देणारे संशोधन

करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भूतो न भविष्यति’ असा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे, आणि तो वाढत जाणार आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणाऱ्या इंटरनेट आणि स्मार्टफोनसारख्या सुविधांची इतर नवतंत्रज्ञानाशी सांगड घालून संपूर्ण भारताला जगाच्या डिजिटल नकाशावर आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘डिजिटल इंडिया’ सरकारने हाती घेतली. बऱ्याचशा सार्वजनिक सुविधा ‘इ’ म्हणजे इलेक्ट्रॉनिक मार्गाने पुरवणे सुरूही झाल्याचा अनुभव निदान शहरी व निमशहरी भागातील रहिवाशांना येत आहे. अगदी घरच्या लॅँडलाइन फोनचे बिल भरण्यापासून एखादी जनहितार्थ याचिका सामूहिकरीत्या न्यायालयाकडे पाठवण्यापर्यंतची विविध कामे आता डिजिटल पद्धतीने होऊ लागली आहेत. संगणकीकरणाची सुरुवात काही वर्षांपूर्वी, जमीन महसूल खात्यापासून झाली. जमिनीच्या मालकीबाबतच्या सर्व नोंदी, नकाशांसहित, संगणकामध्ये भरण्याच्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये सुरुवातीला बरेच अडथळे आले, परंतु आता ही प्रणाली व्यवस्थितपणे स्थिरावली आहे. प्रणालीच्या वापराने आपणांस अनेक सरकारी दाखले, प्रमाणपत्रे आणि आकडेवारी मिळवता येते तसेच सरकारला देण्याची रक्कमही ह्या मार्गाने जमा करता येते. ह्यासाठी आपल्या घरी किंवा कार्यालयात संगणक, इंटरनेट आणि प्रिंटर असल्यास फारच उत्तम, परंतु ते शक्य नसल्यास सायबरकॅफे किंवा सामाईक सुविधा केंद्रांमध्ये जाऊनही आपण ही कामे करू शकता. एकंदर ई-शासनपद्धतीचे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बरेच फायदे आहेत. प्रत्यक्ष फायद्यांपैकी सर्वात मोठा फायदा म्हणजे आपणांस सोयीच्या वेळेत व ठिकाणी बसून, रस्त्यावरची गर्दी आणि वाहतूक समस्या टाळून ह्यामधील बरीचशी कामे होऊ शकतात. सक्षमीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…

राज्यात पुणे हे मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे भारतातील प्रमुख वाढणाऱ्या औद्योगिक शहरांपैकी एक आहे. शहराला एक समृद्ध वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पुण्याच्या समृद्ध संस्कृती आणि विपुल शैक्षणिक पर्यायांमुळे या शहराला अनुक्रमे ‘सांस्कृतिक राजधानी’ आणि ‘पूर्वेची ऑक्सफोर्ड’ अशी पदवी मिळाली. एकविसाव्या शतकात वेगात वाढलेल्या माहिती तंत्रज्ञान उद्योगामुळे पूर्वेची “सिलिकॉन व्हॅली ” अशी नवीन बिरुदावली मिळाली. वेगाने वाढणाऱ्या आयटी उद्योग आणि ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या अन्य उद्योगांमुळे पुण्याला वैश्विक ओळख मिळाली आहे. एकेकाळी पेन्शनरांचे आवडते ठिकाण ही ओळख असणारे पुणे आता व्यावसायिकांचे पुणे म्हणून ओळखले जाते. पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड ही जुळी नगरीही आता कात टाकत आहे. युवकांच्या आशाआकांक्षाची पायाभरणी पुण्यातच होते. संगणक व माहिती तंत्रज्ञान उद्योग लवकरच ह्या शहराचा प्रथम क्रमांकाचे रोजगार देणारा म्हणून आगामी दहा वर्षात ओळखला जाईल. बांधकाम, वाहतूक, रिटेल, मनोरंजन, उपाहारगृहे, गुंतवणूक अशा अनेक उद्योगांचे अप्रत्यक्ष ग्राहक हे संगणक व्यावसायिकच आहेत. एकेकाळी फक्त मराठी भाषकांचे पेठातील पुणे आता इतिहासजमा झाले असून अनेक अमराठी व परदेशी विद्यार्थी व व्यावसायिक गुण्यागोविंदाने पुण्यात नांदत आहेत.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नाटक ‘आपलं’ होण्यासाठी…

किमान पंधरा हजार परदेशी नागरिक सध्या पुण्यात राहात असून ही संख्या दरवर्षी वाढतच जाईल. वर्क फ्रॉम होममुळे आय टी कर्मचारी कोठूनही काम करतात. ‘डिजिटल नर्ड’ हे त्यांचे नवीन नाव आहे. जागतिक ग्राहकाला सेवा देणारे अनेक छोटे उद्योग त्यामुळे सुरू झाले आहेत . त्यामुळे शहर केंद्रित आय टी स्पर्धा ही आता जवळजवळ नष्ट होत आहे. ज्या शहरातून क्लायंट बिलिंग होतं त्या शहरात उलाढाल नोंद होते. त्याचबरोबर, अनेक स्टार्टअप पुण्यात सुरू झाले आहेत. स्टार्टअप’साठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या जगातील पहिल्या शंभर शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश झाला आहे. किमान २० इन्क्युबेशन सेंटर्स फक्त पुणे शहरात आहेत. दरवर्षी किमान १० नवीन युनिकॉर्न्स पुण्यात तयार होतील. २०३० पर्यंत किमान दीड लाख परदेशी नागरिक पुण्यात असतील. ज्या वेगाने पुण्यातील उद्योगधंदे गेल्या वीस वर्षात वाढले त्याच वेगाने जर पुढील पंधरा वर्षात वाढले तर मुंबईला आपण कधीच मागे टाकलेले असेल. विकासाच्या एक्सप्रेसवेने जोडली गेलेली ही दोन शहरे ‘पुंबई’ म्हणूनच जगभर ओळखली जातील. ही वाढ जर अशीच अविरत हवी असेल तर वीज, रस्ते, मेट्रो , विमानतळ सारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधा वेगाने विकसित व्हायला हव्या. आगामी दशकात आंतरराष्ट्रीय विमानतळ, कार्यक्षम मेट्रो, उत्तम डिजिटल पायाभूत सुविधा, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन जर अस्तित्वात आलं तर पुणे शहराला उत्तम भवितव्य आहे.

अनेक बहुराष्ट्रीय उद्योग नक्कीच पुण्याचा व्यवसायासाठी विचार करतील. २०४० पर्यंतची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून सर्व घटकांना समविष्ट करून एकत्रित विकास आराखडा करायची वेळ आली आहे. नजीकची सातारा, कोल्हापूर, सोलापूर सारखी शहरे उद्याची आय टी हब करण्यासाठी पुण्याने वडील भावासारखा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, तरच सह्याद्री व्हेली ही सिलिकॉन व्हेली म्हणून २०४० म्हणून ओळखली जाईल. अजून एक मुद्दा आहे तो परदेशी भाषा शिक्षणाचा (जपानी , जर्मन , फ्रेंच , स्पॅनिश). पुणे शहरात अनेक परदेशी भाषा शिकवणारे शिक्षक आहेत. बरेच ऑनलाईन मोड मधेही आहेत. काही प्रशिक्षक तर मराठीतून परदेशी भाषा शिकवू शकतात. पण दुर्दैवाने पालक, विद्यार्थी व पारंपरिक शिक्षण पद्धतीला ह्याचे महत्त्व पटलेले नाही. जर पुण्यातील प्रत्येक युवक-युवती फाडफाड परदेशी भाषा बोलू शकला तर अनेक जागतिक उद्योग पुण्याचा विचार गांभीर्याने करतील. हा शहराचा व्यूहात्मक फायदेशीर दृष्टिकोन ठरू शकतो. ह्यासाठी अभ्यासक्रम, नियम बदलायची वाट पाहण्याची गरज नाही. सुरुवात स्वतःपासून करा. फार पूर्वीपासून रोटी-कपडा-मकान ह्या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या गेल्या आहेत.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे व्हावे ‘ई-सिटी’!

बदलत्या काळानुसार ह्यामध्ये जरा भर घालून बिजली-बँडविड्थ ह्या दोन बाबींचाही समावेश केला गेला पाहिजे. समाजजीवन पद्धतीचे निकष व नियम हे सतत बदलत आहेत. करोनानंतर वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती अनेक आय टी उद्योगांनी स्वीकारली (फायदे तोट्या सकट ). पण त्याला अपेक्षित असणारी सातत्यपूर्ण शक्तिशाली इंटरनेट बॅण्डविड्थ व मोबाइल रेंज पुण्यात अजिबात अस्तित्वात नाही. कुठलाही मोबाइल कॉल आपण सलग बोलून संपवला असे क्वचित घडते. सतत होणारे कॉल ड्रॉप , क्षीण वायफाय हे घटक डिजिटल उद्योगाला मारक आहेत. जर वाहने विकली, पण रस्ते बांधले नाहीत तर जे वाहतुकीचे होते तीच परिस्थिती टेलिकॉम क्षेत्राची झाली आहे. सतत डाऊन होणारे सर्व्हर्स , त्यामुळे होणारी अनेक सेवांची गैरसोय हे प्रकार थांबले पाहिजेत. ५ जी तंत्रज्ञान कदाचित काही वर्षात उपलब्ध होईल,पण तोपर्यंत ४ जी तंत्र शक्तिशाली झाले पाहिजे. नेतेमंडळींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व ४जी मोबाइल सेवादेयकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यासाठीचे टॉवर धोरण त्वरित विकसित केले पाहिजे. एकीकडे सेवादेयके जास्तीतजास्त ग्राहक आकृष्ट करण्यासाठी आकर्षक योजना जाहीर करतात, पण विक्रीपश्चात सेवेचे काय? जर पुण्याला जागतिक आय टी हब (केंद्र) बनायचे असेल तर हा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला पाहिजे. दुर्दैवाने कुठल्याही नेत्याला, शासकीय अधिकाऱ्यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही हीच खरी शोकांतिका आहे.

deepak@deepakshikarpur.com

लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.