वेगाने कमी होत चाललेले वजन आणि अन्न सेवन करताना गिळण्यास होणारा त्रास या दोन प्रमुख तक्रारी घेऊन आलेल्या महिलेला अन्न नलिकेच्या कर्करोगाचे निदान झाले. केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया अशा तिन्ही पर्यायांचा वापर करून तिला कर्करोग मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : चार खाटांपासून ६०० खाटांपर्यंतच्या प्रवासातून ‘केईएम’च्या रुग्णसेवेला ११० वर्षे पूर्ण

कर्करोग शल्यविशारद डॉ. जयपाल रेड्डी यांनी या महिलेवर उपचार केले. डॉ. रेड्डी म्हणाले,की वजन घटणे आणि अन्न गिळण्यास त्रास यावरून अन्ननलिकेच्या कर्करोगाची शंका येत होती. आवश्यक तपासण्यांमधून अन्न नलिकेत गाठ असल्याचे स्पष्ट झाले. बायोप्सीमधून ही गाठ कर्करोगाचीच असल्याचे दिसून आले. कर्करोगाचा प्रसार लक्षणीय असला तरी इतर अवयांमध्ये तो पसरला नव्हता. केमोथेरपी आणि रेडिएशन दिल्यानंतर एका आठवड्यातच रुग्णाचा अन्न गिळण्याचा त्रास कमी झाला. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या अन्न नलिकेतील कर्करोग संपूर्ण काढून टाकण्यात आला. ही शस्त्रक्रिया करणे गुंतागुंतीचे आहे, कारण पारंपरिक पद्धतीने केेलेल्या शस्त्रक्रियेत मोठ्या जखमा, त्यामुळे रक्तस्त्रावही अधिक होतो. या रुग्ण महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा पर्याय निवडून कमीत कमी छेद आणि वेदनाही कमी राहतील अशी काळजी घेण्यात आल्याचे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले. तळेगाव येथील टिजीएच ऑन्को-लाईफ सेंटर येथे या महिलेवर उपचार करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A patient overcomes cancer of the esophagus pune print news amy
First published on: 07-10-2022 at 14:53 IST