लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पत्नीच्या त्रासामुळे एका ज्येष्ठ नागरिकाने हडपसरमधील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केल्याचे आढळून आले आहे.

विलास गेनबा लगड (वय ६२, रा. लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत विलास यांचा मुलगा सागर (वय ३२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुजाता गुरव (वय ५०) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लगड यांची पहिली पत्नी ललिता यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर गेल्या वर्षी लगड यांनी सुजाता हिच्याशी दुसरा विवाह केला. विवाहानंतर सुजाताने घर नावावर करण्याची मागणी केली. सुजाताच्या त्रासामुळे लगड मे महिन्यात घरातून निघून गेले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पु्न्हा घरी आणले होते. त्यानंतर लगड वेगळे राहत होते.

हेही वाचा… प्रवाशांसाठी खुशखबर! पुण्याहून आता थेट विमानाने बेळगावला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ दिवसांपासून सुजाताने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगड यांनी हडपसर भागातील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. लाॅजमधील खोलीतून लगड यांचा मोबाइल संच जप्त करण्यात आला. सुजाताच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लगड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली होती. लगड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइलवर चित्रीकरण केल्याचे आढळून आले.