भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार प्राध्याापक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्ता भागात घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषाली तुषार थिटे (वय ३८, रा. सुदत्त संकुल, शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून त्याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डंपरचालक घटनास्थळी डंपर सोडून पसार झाला असून पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे, अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली,

थिटे नऱ्हे परिसरातील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. शुक्रवारी (२९ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास त्या दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होत्या. वडगाव बुद्रुक परिसरातील शिंदे मैदानाजवळील रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या प्रा. थिटे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman professor died after being hit by a dumper pune print news amy
First published on: 29-07-2022 at 15:22 IST