मंडईतील गजबजलेल्या रामेश्वर चौकात मंगळवारी रात्री एका तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे पूर्ण नाव समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा- पुणे : भीमा- कोरेगाव जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक बदल
शिंदे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे पूर्ण नाव पोलिसांना समजले नाही. रामेश्वर चौकातून रात्री नऊच्या सुमारास शिंदे निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्याच्यावर कोयत्याने वार करुन पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.