पुणे : व्यायमशाळेत चेष्टा केल्याचा समज झाल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी प्लेट मारली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, सहकारनगर पोलिसांनी एकास अटक केली. राहुल दीपक टेकवडे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा – VIDEO : गोष्ट पुण्याची – ११० : पुण्यातील अरण्येश्वर परिसर आणि मंदिराचा इतिहास

हेही वाचा – भुजबळ-जरांगे वाद शिगेला; न्या. शिंदे समितीने घेतली ‘ही’ भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रणव मोरे (वय २३, रा. दत्तनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. टेकवडे आणि मोरे ओळखीचे आहेत. दोघे एका व्यायामशाळेत जातात. मोरे चिडवत असल्याचा गैरसमज टेकवडेला झाला होता. व्यायामशाळेत दोघांमध्ये वाद झाला. टेकवडेने व्यायामशाळेतील दहा किलो वजनाची लोखंडी प्लेट माेरेच्या डोक्यात मारली. त्याला शिवीगाळ करुन टेकवडेने जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक बेरड तपास करत आहेत.