पुणे : सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; नाना पेठेतील घटना

टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

goons stabbed in pune
खुनाचा बदला घेण्यासाठी गुंडावर कोयत्याने वार (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

महंम्मद जुबेर मेहंदी हसन शेख (वय २७, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नावे आहे. शेख याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शादाब शाहीद शेख (वय २६, रा. तांबोळी गल्ली, डायस प्लॉट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे; अटीतटीच्या लढतीत उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव

हेही वाचा – …अन् लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर झाले!

महंम्मद शेख नाना पेठेतील एसएस कार डेकोर येथे कामगार आहे. त्याच्या दुकानाच्या शेजारील रुबी मोटर्स दुकानात आरोपी शादाब शेख हा कामगार आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. शादाब आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी महंम्मद याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने एसएस कार डेकोर दुकानातील सामानाची तोडफोड करून ४० हजार रुपयांचे नुकसान केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 14:52 IST
Next Story
…अन् लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर झाले!
Exit mobile version